मन जिथं ओढ घेतं, तिथं आपण गुंतत जातो!वाचा सविस्तर-

प्रत्येक पुरुषाच्या हृदयात एखादी ती हृदयस्थ असते! आणि प्रत्येक स्त्री च्या मनात तो एखादा वेल्हाळ असतो!! होतं असं मनुष्य जन्म आपला त्यात स्त्री,पुरुष भावना इतक्या नाजूक, कोमल, अलवार असतात की त्यात हे हृदयस्थ होणं अगदी नॉर्मल होतं!!!

जर तुम्ही कुणाच्या मनात, हृदयात,अंतरी असाल तर ते असणं अधिक मोहक असतं!!

कधी कुणी व्यक्त होतं, कधी कुणी अव्यक्त राहतं!! अव्यक्त राहणं तर खूप मधुर,भावुक असतं!!! कुठल्याही नात्यांत, संबंधात जोर, जबरदस्ती नसावी, एक तरल मोहकता असावी!! मला कुणीतरी आवडते,आवडतो असं होतं संगळ्याच्या बाबतीत.. त्यात किती आपण नाकारलं तरी तसं मन नाकारतं नाही !! तुम्ही दुनियेला फसवाल पण मनाला नाही फसवू शकतं!! आणि हे मनच अल्लड, अवखळ बनतं आणि हलकेच ती किंवा त्याच्यात गुंतून जातं!!

 

वयाच्या कुठल्याही टप्प्यावर हे गुंतण होतं, ह्यात वय, अंतर, दिसणं किंवा इतर या कुठल्या ही बाबी मध्ये येतं नाही!! मनापासून कुणी आवडलं की ती व्यक्ती हृदयात राहते, हृदयाच्या तारा अलगद झेडते!! आणि ह्या भावना खूप गोड असतात.. माणसाचं मन मुग्ध,लुब्ध होतं, लहान, वेडं,बावर असही होतं.. ते तसं होतं कारण हे मन कुणाततरी मोहरतं.. त्यामुळे मनाला मुक्त करा, वेल्हाळ करा!! ठेवा की हृदयात कुणाला अलवार असं !! अहो हृदय सतत धडधडतं आणि ती धडधड म्हणजे ती किंवा तो असू शकते!

 

कितीही ठरवलं तरी मन जिथं ओढ घेत तिथं तुमचं मन गुंतलं असं समजा.. आणि एकदा मन गुंतलं की ते इतकं गुंतून जातं की तो किंवा ती अबोल हृदयस्थ होऊन जातात….

मनात राग,असूया, द्वेष नको, तर मनात ती किंवा तो अव्यक्त, अबोल, मधुर असं असावं!! मग ह्यात कुणाचं बोलणं, वागण आवडतं कुणाचा आवाज, मन आवडतं, कुणामध्ये बरचसं गोड असतं, की त्या गोडव्यात आपण अजून साखरे सारखं विरघळावं!! त्यात आपलं हृदय आणि मन मधुर होतं!!

हे कुणाचं हृदयात रेंगाळण अवीट गोडीने जपावं!! मी हे लिहलं ते खरं आहे सत्य आहे!! आयुष्याच्या कुठल्याही टप्यावर ती किंवा तो मनात मोहरुन येणं होतं.. कुणाची आठवण येणं, अंतरी तगमग होणं, मनात काहूर उठणं, त्याने किंवा तिने राग,अबोला धरला अगदी दुरावा धरला, आला तरी हृदय बावरतं ह्यातच मग ती किंवा तो अंतरी खोल हृदयात आहे असं समजावं!! आणि ते नाकारण म्हणजे मनाला फसवण!!

हे अंतरी आवडणं, मनात असणं दोन्ही कडून असेल तर गोड आणि एकीकडून तसं असेल तर हळवं अबोल!! पण मनात, हृदयात कुणी न कुणी असतं, येऊन जातं हे सगळ्यांच्या बाबतीतं होतं… वयाच्या आधी, मध्य, किंवा नंतर कुठल्याही टप्प्यावर हृदयस्थ ती किंवा तो होतो!! आणि हे मी लिहलं हे वाचतांना रसिकहो प्रत्येकाला आपला भूत, वर्तमान काळ नक्कीच आठवेल! आणि त्या आठवणीत मन अधिक मोहरेल!! जे असे मनात आणि हृदयात हृदयस्थ होतात ते नशीबवान!! खूप सुंदर, सुखद, तरल असतात ह्या भावना…
मन माझे कुठे आहे! कोण अलवार हृदयी आहे!!विचारा तुम्ही तुमच्या मनाला!

रसिकहो एकदा मनाने तरुण व्हा, व्यक्त व्हा, अव्यक्त व्हा, मुग्ध व्हा.. पण मनात कुणालातरी हृदयस्थ करा!! आणि अंतरी हृदयात तो किंवा ती कुणालातरी नक्कीच साठवून घ्या, की तुमच्या मनाला तुमच्या हृदयाचा हेवा वाटेल….!!!!

कोण असावे मनात
हृदय धडधडे अलगद,
असावे अंतरी कोणी
अलवार मी हृदय चोरुनी..

कोण असावे हृदयात
तुझे भास होतात अलगद,
असावे अंतरी कोणी
हलकेच सख्या तू हृदय अंगणी..

ग्लोबल न्युज नेटवर्क: