राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Today’s Horoscope 31 July 2023
वार- सोमवार.

शुभाशुभ विचार – क्षयतिथी.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- पूर्वाशाढा 18.58 पर्यंत नंतर उत्तराशाढा.
चंद्र राशी – धनु.
—————————————-


मेष ( शुभ रंग- पांढरा )
आज उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस आहे. नोकरीत साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. कार्यक्षेत्रात आज काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

वृषभ (शुभ रंग- हिरवा)
आज फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही संध्याकाळी गाडी हळूच चालवा.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )
आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्यायला हवे. हौस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. आज व्यर्थ वाद टाळा.

कर्क (शुभ रंग- लाल)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक असणे गरजेचे आहे.

सिंह (शुभ रंग- मरून)
आज तुमचा हाऊस मौज करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज तेजीत चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढेल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर वाद संभवतात.
वृश्चिक (शुभ रंग- राखाडी) Today’s Horoscope 31 July 2023
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.

धनु (शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवरांना योग्य स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च करू शकाल इतरांच्या भानगडीत आज यशस्वी मध्यस्थी कराल.

मकर ( शुभ रंग- डाळिंबी )
खर्चाचे प्रमाण वाढले तरीही पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ (शुभ रंग – भगवा)
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा राहील.

मीन (शुभ रंग – गुलाबी )
नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करायची तुमची आज तयारी असेल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.

ग्लोबल न्युज नेटवर्क: