राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 01 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार- मंगळवार.

01.08.2023.

शुभाशुभ विचार – 14 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – लोकमान्य टिळक पुण्यतिथी.

राहू काळ – दुपारी  3.00 ते  04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र- 16.03 पर्यंत उत्तराशाढा नंतर श्रवण.

चंद्र राशी – मकर.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- तांबडा )

उद्योग धंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. हाताखालचे लोक तुमच्याशी आदबिने वागतील. आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरू शकते. कायद्याची चौकट मोडणे महागात पडेल.

मिथुन ( शुभ रंग- लाल )

विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

कर्क (शुभ रंग- जांभळा)

आज चैनी व विलासी वृत्ती बाळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंत आज मिळालेल्या संधीचे सोने करतील.

सिंह (शुभ रंग- पिस्ता)

काम कमी व दगदग जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. इथे शत्रूंच्या कारवाया वाढतील सतर्क रहा.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

वाहनाची खरेदी विक्री फायदा देईल. शेअर्स बाजारातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. प्रेम प्रकरणे फुलतील, बहरतील.

तूळ ( शुभ रंग- पांढरा)

धंद्यातील येणी वसूल होतील. विरोधकांशीही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्याल. गृहिणींना वाढत्या घरगुती जबाबदाऱ्यांना तोंड द्यावे लागेल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. प्रवासात आज काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

धनु- (शुभ रंग- भगवा)

आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून स्वार्थ साधून घ्या.

मकर ( शुभ रंग- निळा )

आज तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल. किरकोळ गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. आज जशास तसे या धोरणाने वागा. मोफत सल्लागार मंडळींना जरा लांबच ठेवा.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी)

पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. घरात आज थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: