राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 25 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार

25. 07.2023.

शुभाशुभ विचार- 15 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 3.00  ते 4.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – चित्रा 24.03 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी – कन्या 11.13 पर्यंत नंतर तूळ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- सोनेरी )

वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदारास दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही उगीचच इतरांच्या भानगडीत लक्ष द्याल.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )

नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रयत्नांना नशिबाची साथ आज नक्की मिळणार आहे.

मिथुन ( शुभ रंग- चंदेरी )

आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी एखादी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष पुरवा.

कर्क (शुभ रंग- पांढरा )

तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस असेल. गृहिणी स्वतःचे छंद जपू शकतील. जमाखर्चाचा तराजू आज समतोल राहीलच. आज गृह सौख्याचा दिवस.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासचे प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

धनस्थानातील चंद्र भ्रमण तुमची आर्थिक आवक वाढवेल. आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. आज छान दिवस आहे.

तूळ ( शुभ रंग- राखाडी )

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मानसिक स्थिती उत्तम असेल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळाल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल राहील. मित्रांनी केलेल्या खोट्या चुकीनेही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी खर्चही कराल.

मकर ( शुभ रंग- निळा )

आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)

आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ शंभर टक्के राहील. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी असेल. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती श्रद्धाळू होणार आहेत.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी)

जे चाललंय ते बरंच चाललंय म्हणावे. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे आज टाळलेली बरी. आज सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: