आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – सोमवार
24.07.2023.
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – हस्त.
चंद्र राशी – कन्या.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- मोतिया )
आज तब्येत थोडी नरमच राहील काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. तुमची काही येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होऊ शकतील. आज प्रवासात मात्र सावध राहा.
वृषभ (शुभ रंग- सोनेरी )
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रात नवोदताना उत्तम संधी चालून येतील.
मिथुन ( शुभ रंग- पांढरा )
शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.
कर्क (शुभ रंग- सोनेरी)
कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आज जरा आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा.
सिंह (शुभ रंग- पिस्ता )
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे करू शकाल.
कन्या ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.
तूळ ( शुभ रंग- निळा )
आज घरात वडीलधाऱ्यांचे मूड सांभाळावे लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.
वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ आनंदात जाईल.
धनु- (शुभ रंग- क्रीम)
नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे मात्र अवघड होईल.
मकर ( शुभ रंग- आकाशी )
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करा. आत्मविश्वासाचा अतिरेकही नुकसानास कारणीभूत होऊ शकतो. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.
कुंभ (शुभ रंग – डाळिंबी)
कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात आज भांड्याला भांडे लागू शकते.
मीन -(शुभ रंग – मोरपंखी)
आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या मागण्या मान्य करतील. वैवाहिक जोडीदाराशी आज चांगले सूर जुळतील.
शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क -9689165424