धक्कादायक ! पुण्यात एसीपीने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःही केली आत्महत्या

धक्कादायक ! पुण्यात एसीपीने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःही केली आत्महत्या

अमरावती पोलीस दलातील राज पेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने पुण्यात पत्नी आणि पुतण्याची ( Pune ) हत्या करुन स्वतःला संपवलं आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात राज पेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी ,दोन मुले आणि पुतण्या हे कुटुंबीय  बाणेर येथे राहत होते. गेल्या शनिवारी ते सुट्टीवर आले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भारत यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला व स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. त्यांनी परवाना असलेल्या त्यांच्या खाजगी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आहेत    .

दरम्यान त्यांनी हत्या आणि आत्महत्या का केली हे मात्र समजले नसून चतु:शृंगी पोलीस ( Pune ) अधिक तपास करीत आहेत.

मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: