राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 7 August 2022 वार – रविवार.
शुभाशुभ विचार- 16 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष — साधारण दिवस.
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – अनुराधा 16.30 पर्यंत. नंतर ज्येष्ठा
चंद्र राशी – वृश्चिक
_________________________

आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- पिस्ता)
आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा, सतर्क रहा.
वृषभ- ( शुभ रंग- लाल)
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ असेल.

 

मिथुन (शुभ रंग- चंदेरी)
कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.
कर्क – (शुभ रंग- क्रीम)
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल.

 

सिंह- ( शुभ रंग- हिरवा)
कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा आज तुमचा मूड असेल आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालावे लागेल. गृहिणी मुलांच्या अभ्यासात डोकावतील.
कन्या- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कष्टांचा हि अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण हे लक्षात असू द्या. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क कसे करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

तूळ -(शुभ रंग – मरून)
खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही. घर खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील. हवे हवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधुळ झाडतील.
वृश्चिक- ( शुभ रंग- जांभळा)
व्यावसायिक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्याच मतावर अडून बसाल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

धनु -(शुभ रंग – निळा)
आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. काही अनावश्यक खर्चही कराल.
मकर- ( शुभ रंग- भगवा)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडेल. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपून वापरावी.

कुंभ-( शुभ रंग- मोतिया)
आज तुमसे मनोबल उत्तम असून काही मनासारख्या घटना घडतील. दैनंदिन व्यवहार विनाव्यत्यय पार पडतील. वास्तू किंवा वाहन खरेदीचे व्यवहार मार्गी लागतील.
मीन (शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक घटना घडतील. नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. ऑफिस कामाच्या व्यापात कौटुंबिक गरजा दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: