आजचे राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 August 2023
वार- शनिवार.
12.08.2023.
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- कमला एकादशी.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.
—————————————-


मेष ( शुभ रंग- पिस्ता)
आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पांमध्ये तुमचा बराच वेळ फुकट जाईल. सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामी येतील. आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.

वृषभ (शुभ रंग- चंदेरी )
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल. अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठबस अगत्याने कराल. आज मोजकेच बोलणे प्रभावी राहील.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी )
आज तुम्ही स्वतःच्याच प्रेमात राहाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा अट्टहास असेल तरी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय अनुभवींच्या सल्ल्यानेच घ्यावेत.

कर्क (शुभ रंग- गुलाबी )
कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमाखर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. प्रवास घडतील.

सिंह (शुभ रंग- जांभळा )
आज लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सूप्त इच्छा पूर्ण करेल. मुला मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभ चिंता म्हणजे शुभच होईल. वाणित गोडवा असू द्या.

कन्या ( शुभ रंग- क्रीम)
मित्रमंडळींना दुरूनच राम राम करून आज तुम्ही आपल्या ध्येयप्राप्तीस प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध करू शकाल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

तूळ ( शुभ रंग- हिरवा)
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत आज अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरू शकते. कायद्याची चौकट मोडणे महागात पडेल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नवीन व्यवसायात भागीदारांमध्ये काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतात. जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक आज तरी करू नका. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करा.

धनु (शुभ रंग- आकाशी)

तुमच्या कुटुंबात आज खेळीमेळीचे वातावरण असेल आज तुम्ही जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल व्यवसायात भागीदारांमध्ये सुसंवाद असल्याने योग्य व्यावसायिक निर्णय आज तुम्ही घेऊ शकाल

मकर ( शुभ रंग- केशरी ) Today’s Horoscope 12 August 2023 
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. ज्येष्ठ मंडळींना आज काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील.

कुंभ (शुभ रंग – पांढरा)
आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बाळावेल. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी उत्तम संधी चालून येतील.

मीन (शुभ रंग – क्रीम)
बरेच दिवसापासून रेंगाळलेली घरगुती कामे आज तुम्ही पूर्ण कराल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांना कर्ज मंजुरी होऊ शकते. आज मुले पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: