आजचे पंचांग – वार – शनिवार, दिनांक 26 मार्च 2022
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा 14.47 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
चंद्र राशी – धनु 20.28 पर्यंत नंतर मकर.
—————————————-
आजचे राशीभविष्य –
मेष – (शुभ रंग – राखाडी )
व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. नोकरी धंद्यात काही अडचणींचा सामना करावा लागेल सहकाऱ्यांशी मिळून-मिसळून राहिलेले बरे. ज्येष्ठ मंडळींनी सत्संगाकडे पावले वाळवावीत.
वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)
वडीलधार्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाच्या मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी ही नमते घ्यावे लागेल. आज अहंकारास सुट्टीच देणे हिताचे राहील.
मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)
आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. महत्वाच्या चर्चा वाटाघाटी उद्यावर ढकलाव्यात.
कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)
ज्येष्ठ मंडळींनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मामा मावशी कडून आज काही महत्त्वाच्या बातम्या येतील. नोकरदार मंडळींना जास्त थांबून कामे पूर्ण करावी लागतील.
सिंह -( शुभ रंग -स्ट्रॉबेरी )
बरेच दिवसांनी आज तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असे वातावरण असेल.
कन्या- ( शुभ रंग- पिस्ता)
काही नव्या ओळखी होतील तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.
तुळ – ( शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा संघर्ष चालूच राहील.
वृश्चिक- ( शुभ रंग- जांभळा)
आज अनपेक्षित काही रक्कम हाती आल्याने इतरांना दिलेले शब्द पाळाल. व्यवसायातील तुमचे अंदाज खरे ठरतील. काही कारणास्तव शेजारी रुसून बसण्याची शक्यता आहे.
धनु – (शुभ रंग – मोरपिशी)
आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. जवळपासच्या प्रवासात खोळंबा होऊ शकतो.
मकर- ( शुभ रंग – मरून)
आज पैसा कितीही आला तरी कमीच पडेल. आज स्वतःचे लाड पुरवाल. उंची वस्त्र खरेदी कराल. प्रवासात सतर्क रहा एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.
कुंभ- ( शुभ रंग- नारिंगी)
आज आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.
मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)
हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. दुपारनंतर एखादा लाभ संभवतो.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)