राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग –  वार – शनिवार, दि. 19.03.2022  

शुभाशुभ विचार – वसंतोत्सवारंभ

आज विशेष – दर्श अमावस्या.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – हस्त 23.38 पर्यंत नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या.

————————————

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. तब्येतही जरा नरमच असल्याने आजचा दिवस कंटाळवाणा जाईल. काही मोफत सल्लागार माणसे उगीच डोक्याला ताप देतील.

वृषभ -( शुभ रंग- मरून )

नवीन ओळखी व्यवसायवृद्धीसाठी फायदेशीर ठरतील. विरोधकांशी धूर्तपणे वागून स्वतःचा स्वार्थ साधून घ्याल. आज तुम्ही जरा मौजमजेस प्राधान्य द्याल.

मिथुन – (शुभ रंग- हिरवा )

कुटुंबीयांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. मुले आज अभ्यासास प्राधान्य देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.

कर्क -(शुभ रंग – पांढरा )

कोर्टकचेरीची कामे पुढे सरकतील. शेजाऱ्यांकडून काही सुवार्ता येतील. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. प्रॉपर्टीचे व्यवहार आज नकोत.

सिंह- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कठोरपणे बोलून कोणाचे मन दुखवू नका.

कन्या – ( शुभ रंग – पिस्ता )

आज तुम्ही एखादी क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. विरोधक तुमच्या चुका काढतील. संयम ढळू  देऊ नका. पत्नी आज योग्य तेच सल्ले देणार आहे.

तुळ – ( शुभ रंग – मोतिया)

उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. काहीजणांना अचानक दूरच्या प्रवासास निघावे लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक- ( शुभ रंग- सोनेरी )

उद्योग व्यवसायात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. मित्र-मैत्रिणी तुमचा शब्द झेलतील. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल.

धनु – (शुभ रंग -आकाशी )

नोकरीधंद्यात उत्साही दिवस राहील.  योग्य वेळी अधिकार वापरावे लागणार आहेत. प्रतिष्ठितांच्या ओळखी कामी येतील.  आज एखाद्या मित्रांस मदत कराल.

मकर – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामात काही अडथळे येणार आहेत आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. काही येणी असतील तर मागितल्यावर वसूल होतील.

कुंभ ( शुभ रंग – लाल )

आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार उद्यावरच ढकलले तर बरे होईल. जोडीदाराच्या लहरी सांभाळाव्या लागतील.

मीन – ( शुभ रंग – क्रीम )

उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस आज समर्थपणे तोंड द्याल. नोकरदारांना ऑफिसमध्ये साहेबांचे व घरात पत्नीचेही मूड सांभाळावे लागतील. संध्याकाळी एखाद्या सत्संगात रमाल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: