राशिभविष्य: कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी; वाचा सविस्तर

आजचे पंचांग वार – गुरुवार, दि. 17.03.2022

शुभाशुभ विचार- वर्ज्य दिवस.

आज विशेष – हुताशनी पौर्णिमा.

राहू काळ – दुपारी 1.30  ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————————-

आजचे राशीभविष्य –

मेष – (शुभ रंग – मोतिया)

नोकरीच्या ठिकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. बर्‍याच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील.

वृषभ -( शुभ रंग- सोनेरी )

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांना मात्र निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

मिथुन- ( शुभरंग – केशरी )

ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. वाद-विवाद संभवतात. गृहिणींनी आज सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. परंतु भावनेच्या भरात कोणालाही कसलीही वचने देऊ नका.

सिंह – ( शुभ रंग – मरून )

आज तुमचा आत्मविश्‍वास वाढवणार्‍या काही घटना घडतील. एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवावेत.

कन्या -( शुभ रंग- डाळिंबी )

आज काही दुरचे नातलग संपर्कात येणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.

तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )

जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी )

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रमोशन ची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. व्यवसाय करताना भिडस्तपणा नको.

धनु – (शुभ रंग- जांभळा )

हितशत्रू सक्रीय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज परिश्रमाने यश सोपे होईल दैवाची साथ तर आहेच. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी )

विरोधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते.

कुंभ- (शुभ रंग- मोरपिशी)

घराबाहेर आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. प्रवासात मात्र खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

अती श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. कार्यक्षेत्रात हितशत्रू मित्रांमध्ये ही लपलेले असू शकतात सतर्क रहा.

 ग्लोबल न्यूज च्या सर्व वाचकांना  होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा* .

!! शुभम भवतु!!

श्री. जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी आणि वस्तू सल्लागार )

ग्लोबल न्युज नेटवर्क: