“बारामती म्हणजेच यांचा महाराष्ट्र आहे”, भाजपच्या या आमदाराने साधला निशाणा

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद-विवाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच बिबट्या सफारी कुठे होणार असा प्रश्न पुणे जिल्ह्यात चर्चेत आला होता. पण आता ही सफारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात होणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे.

पुण्यातील वनविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान यावरूनच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार राम सातपुते यांनी थेट रास्तवराडीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. या संदर्भात ट्विट करून पवारांवर ही टीका केली आहे.

“बारामती म्हणजेच यांचा महाराष्ट्र आहे. पवारांना वाटते बारामती चा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास. जुन्नर सारख्या निसर्गरम्य तालुक्यात हा प्रकल्प करता आला असता पण सगळंच बारामतीला .महाराष्ट्र उपाशी बारामती तुपाशी.”, अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे. या टीकेला राष्ट्वादी काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: