राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार सोमवारदि. 18.04.2022

शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र –  विशाखा.

चंद्र राशी – तुळ 22.08 पर्यंत नंतर वृश्चिक.

—————————————-

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- निळा ) 

कार्यक्षेत्रात स्वतःचे वर्चस्व सिद्ध कराल. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज पत्नीने दिलेले सल्ले फारच उपयुक्त ठरतील. काय करतेस अधिकारांचा वापर जपून करा.

वृषभ – (शुभ रंग – मोरपिशी )

रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी. आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. आज उधारी उसनवारी टाळा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.

मिथुन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

घरात आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर अनेक संधी चालून येतील. नवोदित कलाकारांना उत्तम संधी चालून येतील.

कर्क- ( शुभ रंग – चंदेरी )

सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आज गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांचे हट्ट स्वखुशीने पुरवाल.

सिंह- ( शुभ रंग- जांभळा )

तुमच्या एखाद्या नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामातही काही अडथळे संभवतात. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील.

कन्या- (शुभ रंग- पांढरा )

आज रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवणे हिताचे. प्रवासात खूपच दगदग होईल.

तूळ- ( शुभ रंग- भगवा )

आज वादविवादात तटस्थ राहा. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील. वैवाहिक जीवनात जुन्या स्मृतींना उजाळा द्याल.

वृश्चिक- ( शुभरंग- पिस्ता )

आज टेलिफोन व लाईट बिले भरावे लागतील. काही अत्यावश्यक देणीही चुकवावी लागतील. हौस मौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. काहीजणांना तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे.

धनु- ( शुभ रंग – आकाशी )

वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. संततीकडून सुवार्ता येतील. जिवलग मित्र आज हिताचेच सल्ले देतील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतून लाभ पदरी पडेल.

मकर- ( शुभ रंग- राखाडी )

कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. नेतेमंडळी अधिकारांचा योग्य वापर करतील.

कुंभ – (शुभ रंग- तांबडा )

नवीन उपक्रमांची सुरुवात उद्याच केलेली बरी. गृहिणींचा आज    देवधर्माकडे ओढा असेल व देवही आज नवसास पावेल. अधिकारी वर्गाने अधिकारां पेक्षा कर्तव्याचा विचार केलेला बरा.

मीन – ( शुभ रंग – केशरी )

नव्यानेच   झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करू नका. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. वाहनाच्या वेगावर ही नियंत्रण गरजेचे आहे.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: