राशिभविष्य :जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार – गुरुवार, दि. 28.04.2022

शुभाशुभ विचार – प्रतिकूल दिवस.

आज विशेष – प्रदोष.

राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.

दिशा शूल -दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 17.40 पर्यंत नंतर रेवती.

चंद्र राशी – मीन.

———————————

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग – मरून)

आज रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. खर्च आवाक्‍याबाहेर जाईल महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. काहींचा आज गुढ शास्त्राकडे कल राहील.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा व वेळही असेल. उच्चशिक्षित असाल तर मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये आज तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस!

मिथुन – (शुभ रंग- गुलाबी)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. आज व्यस्त दिवस.

कर्क – (शुभरंग- पिस्ता)

नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. आज वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल व सहकाऱ्यांशी ही जुळवून घ्यावे लागेल. मीपणा सोडलात तर बरीचशी कामे सोपी होतील.

सिंह – (शुभ रंग- पांढरा)

तरुणांनी कुसंगती पासून लांब रहावे. नीतीबाह्य वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. सासुरवाडी कडून एखादा धनलाभ होऊ शकतो.

कन्या – (शुभ रंग- चंदेरी)

नोकरीत वरिष्ठ खुश असतील. हाताखालच्या माणसांवर वचक राहील. आज तुम्ही काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतील.

तूळ – ( शुभ रंग – सोनेरी)

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. वेळीच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. दुकानदारांची उधारी उसनवारी वसूल होईल. हितशत्रू सक्रिय आहेत तुम्ही सतर्क राहा.

वृश्चिक – (शुभ रंग – नारंगी)

महत्त्वाच्या कामास विलंब होईल बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील, हाती असलेला पैसा जपून वापरा. आज प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

धनु – (शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

मकर – (शुभ रंग – निळा)

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. कदाचित शेजाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज लागेल.

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल, त्याचप्रमाणे खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. नाती जपायची असतील तर आज स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून फक्त गोड गोड बोला.

मीन – (शुभ रंग – जांभळा)
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपले व्यक्तिमत्व प्रभावी राहील. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

!! शुभम भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 9689165424 
(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: