‘करारा जवाब मिलेंगा’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेची तारीख ठरली

 

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. खास करून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून सभांचा धडाका लावला आहे. आता सभेला सभेतून उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहे. पुढील महिन्यात 14 आणि 15 तारखेला मुंबईतील बीकेसी मैदानावर शिवसेनाच मेळावा पार पडणार आहे. यावेळी उद्धव ठाकरेंची तोफ चौफेर धडाडणार आहे. सभेला उत्तर सभेतूनच देईन असं म्हणत दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेण्याबद्दल घोषणा केली होती.

अखेर आज शिवसेनेकडून तारीख जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंपर्क अभियानाच्या दुस-या टप्प्याची सुरुवात मुंबईतून होणार आहे. मुंबईतील बीकेसीमधील मैदानात शिवसेनेचा मोठा मेळावा होणार आहे. १४ किंवा १५ मे रोजी शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होईल. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शिवसंपर्क अभियान मेळाव्यात भाषण करणार आहे. त्यामुळे या सभेतून ते मनसे आणि भाजपचा कसा समाचार घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

सभेचे पेव फुटले आहे, आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे. नव हिंदू आणि तकलादू हिंदूत्वादी नकली आले आहे, तुमचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा आहे, असं म्हणणाऱ्यांचा समाचार घ्यायचा आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचा आहे’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिले होते.

Team Global News Marathi: