राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजच दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – सोमवार , दि. 20 सप्टेंबर 2021.

शुभाशुभ विचार – १७ नंतर चांगला दिवस.
आज विशेष – प्रोष्ठपदी पौर्णिमा.
राहू काळ – सकाळी ०७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ २१.५१ पर्यंत नंतर मीन.
———————————————————–

आजचे राशीभविष्य –

मेष (शुभ रंग – पिस्ता)

दैनंदिन सर्व कामे सुरळीत पार पडतील. स्वतःचे काही छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल. पैशांची कमतरता जाणवणार नाही. काही अपुरी स्वप्ने पूर्ण होतील.

वृषभ– ( शुभ रंग- क्रीम)

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होईल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव पडेल. पिताश्री आज योग्य सल्ला देतील. योग्य माणसे संपर्कात येतील.

मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कार्यक्षेत्रातील काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. आज श्रद्धाळूंच्या हाकेला देव नक्की धावून येईल

कर्क – (शुभ रंग- सोनेरी)
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. खाण्या – पिण्यावर ताबा गरजेचा तरुणांनी चुकीची संगत टाळणे हिताचे. व्यसनांपासून दूर राहा.

सिंह– (शुभ रंग – पांढरा)
आज नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. इच्छित ध्येय साध्य होतील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. गृहसौख्याचा दिवस.

कन्या – (शुभ रंग- गुलाबी)
आज काही अप्रिय माणसे संपर्कात येतील. मोफत सल्लगार मंडळीही भलतेच बोअर करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे लक्षात असूद्या.

तूळ -( शुभ रंग- मोरपिशी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. आज तुम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल.

वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी )
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल. घराच्या नूतनीकरणाचे मनावर घ्याल. आपल्या ओळखी वापरून इतरांची कामे कराल.

धनु – ( शुभ रंग-आकाशी)
नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा ही अतिरेक नको, कारण त्याने निराशा पदरी पडू शकते.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्वीकाराल. विरोधकांना आज तुम्ही चोख उत्तर द्याल. लहान भावंडांस मदत कराल.

कुंभ -( शुभ रंग – सोनेरी)

आज हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर महागात पडेल. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो सावध राहा.

मीन – ( शुभ रंग – निळा )

आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. मोठ्या लाभाच्या मोहाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४.

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: