ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – शनिवार, दि. 18 सप्टेंबर 2021.
शुभाशुभ विचार – क्षयदिन.
आज विशेष – शानिप्रदोष
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर 15.26 पर्यंत नंतर कुंभ.
—————————————
आजचे राशीभविष्य –
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी)
व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. एखाद्या रखडलेल्या मोठ्या रकमेची वसुली होऊ शकेल.
वृषभ – (शुभ रंग- राखाडी)
नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अडचणी आज देवालाच सांगितलेल्या बऱ्या.
मिथुन – (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)
नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली माणसे भेटतील झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. आज कामापुरतेच बोला.
कर्क – ( शुभ रंग – सोनेरी)
आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. इतरांना योग्य सल्ले द्याल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. महत्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल. आनंदी दिवस.
सिंह- ( शुभ रंग- पांढरा )
आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्या करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. वैवाहिक जीवनात दुपारनंतर एकमत राहील.
कन्या- (शुभ रंग – गुलाबी)
चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. पैसा उडवायचे अनेक मार्ग सुचतील. आज आरोग्य उत्तम राहील.
तूळ – (शुभ रंग – मोरपिशी )
कुटुंबात आज आर्थिक सुबत्ता नांदेल. गृहिणी घर सजावटीवर खर्च करतील. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे. आज प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.
वृश्चिक-( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल काही जुनी तत्त्वही गुंडाळून ठेवावी लागणार आहेत. आज भाडेकरूंचे घर मालकांशी मतभेद होतील. शेजारी आपलेपणाने डोकावतील.
धनु – ( शुभ रंग- नारिंगी)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. वक्त्यांची भाषणे आज प्रभावी होतील. शेजारी आज कुत्सित नजरेने बघतील. आज संध्याकाळी एखाद्या घरगुती कार्यक्रमास हजेरी लावाल.
मकर – ( शुभ रंग- जांभळा)
अति धावपळ टाळा. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येणार आहे त्याचा वेळीच फायदा घ्या. निर्णय घेण्यास विलंब लावू नका.
कुंभ – ( शुभ रंग -चंदेरी)
कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. आज कोणतीही रिस्क घेऊ नका. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे.
मीन – ( शुभ रंग- मरून )
वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)