…म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो’ चंद्रकांत पाटलांनी दिले स्पष्टीकरण

 

पुणे | भाजपचे नेते आणि माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्याची क्लिप जोरदार व्हायरल होत असून विविध चर्चेला उधाण आले आहे. चंद्रकांत पाटील हे देहू येथील एका कार्यक्रमात पोहोचले होते त्यावेळी माईकवरुन एकाने माजी मंत्री असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं पाटलांनी विधान केलं होतं.

पाटलांच्या या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं होतं. त्यानंतर आज पुण्यात या संपूर्ण प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिल असून विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. मी घडलेला प्रसंग सांगतो. कोविडच्या निमित्ताने नाभिक समाजातील एक तरुण माझ्या संपर्कात आला. त्यावेळी मी त्याला सांगितलं होतं की चांगलं सलून तुला उभं करुन देईन.

ते सलून देहू येथे त्याच्या सासरवाडीला उभं झालं. त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला मी गेलो. तेथे ग्रामीण भागात असलेल्या माईक सिस्टमवरुन अनाऊसमेंट सुरू होती. माजी मंत्री बाळासाहेब ढवळे यांनी पुढे यावं त्यावेळी मी म्हटलं ए माजी काय म्हणतो काही दिवसांनी ते आजी होतील यामध्ये मला माजी मंत्री म्हणू नका असा काही विषय नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिल होत.

Team Global News Marathi: