राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा रविवार तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग वार – रविवार, दि. 05 सप्टेंबर 2021

शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.
आज विशेष – शिवरात्री.
राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – अश्लेषा 18.07 पर्यंत. नंतर मघा नक्षत्र.
नक्षत्र पाया – चांदी
चंद्र राशी – कर्क 18.07 पर्यंत नंतर सिंह.
—————————————

आजचे राशीभविष्य

मेष ( शुभ रंग- पिस्ता)

आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आज मुलांनाही आपला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न कराल. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही आज समाधानी व्हाल.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्हाला मुलांच्या काही शैक्षणिक समस्या भेडसावतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास होणार आहे.

मिथुन- ( शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे उत्तम सहकार्य राहिल. नेहमीच्या कामा व्यतिरिक्त एखादी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागेल. आज आवक समाधानकारक असेल.

कर्क ( शुभ रंग- हिरवा)

आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी पैसाही खर्च कराल. आपल्या सडेतोड बोलण्याने कुणाच्या तरी भावना दुखावतील.

सिंह (शुभ रंग -आकाशी)

ज्येष्ठांनी प्रकृतीची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

कन्या ( शुभ रंग- सोनेरी)

नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. व्यवसायातील उलाढाल वाढेल. सामाजिक जीवनातली प्रतिष्ठा वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.

तूळ – (शुभ रंग- पांढरा)

नोकरीत आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. विरोधकांनाही आज चहा पाजून आपलेसे करावे लागेल. अहंकारास जरा लगाम द्या. थोडे वाका पण मोडू नका.

वृश्चिक ( शुभ रंग -जांभळा)

आत्मविश्‍वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. क्षुल्लक कारणाने घरातील मोठ्यांशी मतभेद संभवतात. जे काय करायचे ते मिटल्या तोंडी करा.

धनु (शुभ रंग -मोरपंखी)

कुठलीही गोष्ट आज सहजसाध्य नसुन अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नको. वैवाहिक जीवनात आज जोडीदारास फार प्रश्न विचारू नका.

मकर (शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अथक प्रयत्ना शिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपून त्यांना रोजगार मिळेल. काही येणी असतील तर मागितल्यावर मिळतील.

कुंभ -( शुभ रंग-मोतिया)

भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद संभवतात. आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवावी.

मीन – (शुभ रंग-चंदेरी)

एखाद्या सामाजिक कार्यात आज पुढाकार घ्याल. काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. काही वैचारिक देवाणघेवाण होईल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: