राऊत यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता

 

जुन्नर | ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचेच सरकार असते, हे लक्षात घ्या, कारण सध्या राज्यात ठाकरे सरकार आहे. पण सगळे आपलेच असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत पुण्यातील जून्नर तालूक्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात म्हणाले आहेत.मात्र आता राऊत यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होऊन तीन पक्षात पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सगळ्यांना शिवसेनेची गरज लागते. राष्ट्रवादीला लागते, काँग्रेसला लागते आणि भाजपलाही लागतेच. यालाच पॉवर म्हणतात. महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचे सरकार असले, तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो सरकार त्यांचेच असते, हे लक्षात ठेवा. संजय राऊत यांनी पुढे बोलतांना आपले वक्तव्य सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, हे ठाकरे सरकार आहे ना, हे काले झाले, आता झाले आहे, दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नावाचे सरकार नाही. ठिक आहे पण सगळे आपलेच आहेत.

तत्पुर्वी राऊतांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना स्वबळावर लढण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त करणाऱ्या पक्षांबद्दल भाष्य केले होते. स्वबळावर लढण्याची भाजप, काँग्रेसची तयारी असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. आता राऊत यांच्या या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देते हे पहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: