राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्युज: आजचे पंचांग वार – गुरुवार, दि. 02 सप्टेंबर 2021

शुभाशुभ विचार – सामान्य दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा 14.57 पर्यंत, नंतर पुनर्वसु.
नक्षत्र पाया – चांदी.
चंद्र राशी – मिथुन.
_______________________

आजचे राशीभविष्य

मेष -( शुभ रंग- चंदेरी)

काही मनाविरुद्ध घटना मनस्ताप देतील. काम कमी व धावपळ जास्त होईल. आज टेलिफोन व लाइट बिले भरावी लागणार आहेत. भावंडात सामंजस्य राहील. मुलांचे मस्ती चे प्रमाण वाढेल.

वृषभ -( शुभ रंग- केशरी)

आवक पुरेशी असून तुमचा मूड छान राहील. कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल आणि अपेक्षित होणारे लाभ मनाला दिलासा देतील. उपवारांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज मोजकेच बोला.

मिथुन (शुभ रंग- पांढरा)

मनाच्या लहरीपणास थोडासा लगाम गरजेचा आहे. महत्त्वाकांक्षांना थोडासा ब्रेक लावून तब्बेतीवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल.

कर्क (शुभ रंग- क्रीम)

हौस मौज करण्यावर काही मर्यादा येतील. काही आवश्यक देणी द्यावी लागणार आहेत. तरुणांनी कुसंगत टाळावी. बचत आज जमणार नाही.

सिंह-( शुभ रंग- सोनेरी)

अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल.

कन्या-( शुभ रंग-पिस्ता)

महत्त्वाकांक्षांचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होईल. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात असू द्या. सर्वात आधी आरोग्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

तूळ – (शुभ रंग- भगवा)

नवीन उपक्रमांची सुरुवात उद्यावर ढकलली तर बरे होईल. शासकीय कामे रखडणार आहेत. नोकरीत वरिष्ठ चक्क खोटी आश्वासने देणार आहेत. गृहिणींनी केलेल्या नवसाला आज देव पावेल.

वृश्चिक-( शुभ रंग- पिवळा)

अंग मेहनतीची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. सासुरवाडी कडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना स्टाईल मारू नका.

धनु (शुभ रंग- निळा)

आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. अत्यंत व्यस्त दिवस असून पत्नीचे सल्ले फार उपयुक्त करणार आहेत. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर (शुभ रंग- हिरवा)

रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता दिसते. आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. येणी वसूल होऊ शकतील.

कुंभ -(शुभ रंग -तांबडा)

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना विविध संधी चालून येतील. ब्युटी पार्लर, सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील.

मीन (शुभ रंग- नारिंगी)

कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील. कुटुंबियांस पुरेसा वेळ द्याल. आज थोडं मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४.
(ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: