राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग वार – बुधवार, दि. 01 सप्टेंबर 2021

शुभाशुभ विचार -17 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – मृग 12.34 पर्यंत नंतर आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन
आजचे राशीभविष्य-

मेष – ( शुभ रंग डाळिंबी)

काही जिवलग मित्रां बरोबर गेट-टुगेदर चे बेत आखाल. आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. भावंडांमध्ये सुसंवाद राहील.

वृषभ- (शुभ रंग पिस्ता)

राशीच्या धनस्थानातून होणारे. चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विरोधकांचा विरोध गोड बोलून थोपवून धराल.

मिथुन-( शुभ रंग- हिरवा)

तरुणांनी मौज मजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका.

कर्क- ( शुभ रंग-निळा)

आपल्या अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते सतर्क राहा. सरकारी नियम तोडल्यास आज दंड चुकणार नाही. आपल्या मर्यादेत रहा.

सिंह- ( शुभ रंग-मरून)

आज तुमची आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. पूर्वीच्या कष्टांचे चीज होईल व यशाची चाहूल लागेल.

कन्या –( शुभ रंग- आकाशी)

आज फक्त नाकासमोर चालणे हिताचे. रिकाम्या गप्पापेक्षा कृतीस प्राधान्य देणे आवश्यक राहील. नोकरीत कामाचा ताण वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्याच दिशेने चालू राहील.

तूळ- ( शुभ रंग -जांभळा)

व्यवसायात आवाक्याबाहेर गुंतवणूक नको. आज कष्टाच्या प्रमाणात मोबदला जेमतेम राहील. सुसंवाद साधून आज तुम्ही विरोधकांची ही मने जिंकु शकाल.

वृश्चिक- (शुभ -रंग निळा)

भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचीही मते समजून घ्यावीत. वैवाहिक जीवनात स्वतःच्या चुका शोधा.

धनु – ( शुभ रंग- गुलाबी)

समाजात व मित्रमंडळीत तुमचा मानतराब वाढेल. सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. सामाजिक कार्यात तुमचे योगदान द्याल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

मकर- ( शुभ रंग -मोरपंखी )

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच असेल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्कीच मिळेल. घराबाहेर डोके शांत ठेवा. वाद नकोत.

कुंभ – ( शुभ रंग -चंदेरी)

हौशी मंडळींना जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. प्रेम प्रकरणे सुसाट धावतील. काही महिला किमती खरेदी करतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल.

मीन – (शुभ रंग -मोतिया)

व्यापार्‍यांच्या उत्पन्नात वाढ होईल. रखडलेले उपक्रम नव्याने सुरु करता येतील. कौटुंबिक प्रश्न सोडवताना आईचा सल्ला आज अवश्य घ्या. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पडतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: