राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज ​- आजचे पंचांग वार – शुक्रवार दि. 13 ऑगस्ट 2021

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – नागपंचमी.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल –
आजचे नक्षत्र – हस्त 07.59 पर्यंत नंतर चित्रा
चंद्र राशी – कन्या 19.29 पर्यंत नंतर तुळ.
_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- राखाडी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. आज अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल. आज काम कमी व दगदगच जास्त होईल. शारीरिक थकवा जाणवेल.

वृषभ – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल असेल, विलासी वृत्ती बळावेल, कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वकांक्षा वाढणार आहेत प्रेम वीरांसाठी आज ग्रीन सिग्नल आहे.

 

मिथुन – ( शुभ रंग – पिस्ता)

कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवाल. पैशाची चणचण भासणार नाही. आईचे मन मात्र आज दुखावू नका.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन मनाजोगत्या नोकरीचे प्रस्ताव येतील. भावाभावांमध्ये सामंजस्याची भावना राहील.

 

सिंह – ( शुभ रंग- हिरवा)

मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. विश्वासातील माणसाकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आज कोणालाही न मागता सल्ला देऊ नका.

कन्या – ( शुभ – रंग भगवा)

आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारू नका. महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या वेळी द्विधा मनस्थिती होणार आहे. एखाद्या चालू उपक्रमात अडथळा येण्याची शक्यता आहे.

 

तूळ – (शुभ रंग- नारिंगी)

आकस्मिकपणे आलेल्या व्यवसायिक अडचणींवर यशस्वीपणे मात कराल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर मुळीच अवलंबून राहू नका. दिवस खर्चाचा आहे बिनधास्त खर्च करा. आज बचतीचा विचारच नको.

वृश्चिक – ( शुभ रंग केशरी)

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह जुळवणी विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य आहे. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल कराल.

 

धनु – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला बेचैन करतील. कौटुंबिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होईल. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेसे मतभेद होतील परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी)

ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना सल्ले देण्याचा ठेका घेऊ नये. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असणे हिताचे राहील. आजी-आजोबांनी घरगुती प्रश्‍नात लक्ष न घालता नातवंडाबरोबर रमावे.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. नवीन ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून पिणे हिताचे राहील. गाडी चालवताना कोणतीही रिस्क नको.

मीन – ( शुभ रंग -आकाशी)

तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. नोकरीसाठी दिलेले इंटरव्ह्यू यशस्वी होतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तु सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: