आमदाराच्या मुलीला ‘थार’ गाडी लवकर देण्यासाठी खासदार सनी देओलचं थेट महिंद्रा कंपनीला पत्र

 

पंजाबच्या गुरुदासपूर लोकसभा जागेवरुन निवडून आलेले भाजपचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलनं महिंद्रा कंपनीला लिहिलेल पत्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सनी देओलनं सुजानपूरचे आमदार दिनेश सिंह बब्बू यांना थार गाडी देण्यासाठी थेट महिंद्रा कंपनीला पत्र लिहिलं आहे. थार गाडी लवकरात लवकर पोहचवण्याची व्यवस्था करावी असं सनी देओलनं पत्रात म्हटलं आहे.

लोकसभा मतदारसंघात सनी देओल नेहमी वादग्रस्त मुद्द्यावरुन चर्चेत असतात. जेव्हा सनी देओल लोकसभा निवडणुकीत उभे राहून जिंकून आले. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. सनी देओल यांनी मतदारांकडे पाठ फिरवल्याने परिसरात ठिकठिकाणी सनीचे बेपत्ता झाल्याचे बॅनर्स झळकले होते. सनी देओल खासदार बनले असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कुठलीही जबाबदारी घेतली नसल्याचा राग लोकांच्या मनात आहे.

आता आमदाराच्या मुलीला तातडीनं थार गाडी देण्याचा आग्रह सनी देओलनं केल्यानं लोकांमध्ये आणखी संताप वाढला आहे. विरोधी पक्षांनी महिंद्रा कंपनीला लिहिलेल्या या पत्रावरुन निशाणा साधला आहे. स्थानिक लोक म्हणतात की, खासदार आमदारांच्या मुलीसाठी पत्र लिहू शकतात परंतु जनतेच्या कामासाठी काहीच करत नाही.

तसेच गुरुदासपूरमध्ये राहणाऱ्या एक स्थानिक व्यक्ती वरुण कोहली यांनी म्हटलंय की, खासदार सनी देओल यांनी आमदाराच्या मदतीसाठी महिंद्रा कंपनीला पत्र पाठवलं. आमची इच्छा आहे एक पत्र त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहावं ज्यात शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवाहन करावं.

 

 

Team Global News Marathi: