राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज ​- आजचे पंचांग वार – मंगळवार दि. 13 जुलै 2021

शुभाशुभ विचार – 15 पर्यंत चांगला दिवस
आज विशेष – विनायक चतुर्थी. ( अंगारक योग)
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
दिशा शूल – उत्तरेस असेल
आजचे नक्षत्र – मघा
चंद्र राशी – सिंह
_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – मोतिया)

नोकरीच्या ठिकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील. तरुणांनी मर्यादेत रहावे.

वृषभ – (शुभ रंग – सोनेरी)

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांना मात्र निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

मिथुन – (शुभ रंग – केशरी)

ऑफिसच्या कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. वाद-विवाद संभवतात. अधिकारांचा गैरवापर टाळा. गृहिणींनी सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा ठेवू नये.

कर्क – (शुभ रंग – हिरवा)

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. परंतु आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द द्याल तर फसाल.

सिंह – (शुभ रंग – मरून)

आज तुमचा आत्मविश्‍वास वाढवणार्‍या काही घटना घडतील. एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवावेत. आज जे चिंताल तेच होईल.

कन्या – (शुभ रंग – डाळिंबी)

आज काही दुरचे नातलग संपर्कात येणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.

तुळ – (शुभ रंग – चंदेरी)

जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. घरगुती कामे दुर्लक्षित होतील.

धनु – (शुभ रंग – जांभळा)

हितशत्रू सक्रीय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज परिश्रमाने यश सोपे होईल दैवाची साथ तर आहेच. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.

मकर – (शुभ रंग – गुलाबी)

विरोधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.

कुंभ – (शुभ रंग – मोरपिसी)

घराबाहेर आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. नेतृत्वाची संधी मिळेल. एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. प्रवासात मात्र खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मीन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

अती श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोट बिघडणार आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)
.

ग्लोबल न्युज नेटवर्क: