राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज ​- आजचे पंचांग. वार – सोमवार. 24 मे 2021

शुभाशुभ विचार — ११ नंतर चांगला दिवस.
आज विशेष – सोमप्रदोष.
राहू काळ – सकाळी ०७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – चित्रा ०९.४९ पर्यंत नंतर स्वाती.
चंद्र राशी – तुळ.

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- निळा )

कार्यक्षेत्र स्वतःचे वर्चस्व सिद्ध कराल. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज जोडीदाराकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील.

वृषभ – (शुभ रंग – मोरपिशी )

रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी, अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

मिथुन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

घरात आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर अनेक संधी चालून येतील. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल.

कर्क – ( शुभ रंग – चंदेरी )

सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आज गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांचे हट्ट स्वखुशीने पुरवाल.

 

सिंह – ( शुभ रंग- जांभळा )

तुमच्या एखाद्या नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामातही काही अडथळे संभवतात. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील.

कन्या – (शुभ रंग- पांढरा )

आज रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवणे हिताचे. प्रवासात खूपच दगदग होईल. हाती पैसा खेळता असेल.

तूळ – ( शुभ रंग- भगवा )

आज वादविवादात तटस्थ राहा. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील. वैवाहिक जीवनात जुन्या स्मृतींना उजाळा द्याल.

वृश्चिक – ( शुभरंग- पिस्ता )

आज टेलिफोन व लाईट बिले भरावे लागतील. काही अत्यावश्यक देणीही चुकवावी लागतील. हौस मौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. काहीजण दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.

धनु – ( शुभ रंग – आकाशी )

वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. संततीकडून सुवार्ता येतील. जिवलग मित्र आज हिताचेच सल्ले देतील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतून लाभ पदरी पडेल.

मकर – ( शुभ रंग- राखाडी )

कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. नेतेमंडळी अधिकारांचा योग्य वापर करतील.

कुंभ – (शुभ रंग- तांबडा )

नवीन उपक्रमांची सुरुवात उद्याच केलेली बरी. गृहिणींचा आज देवधर्माकडे ओढा असेल व देवही आज नवसास पावेल. अधिकारी वर्गाने अधिकारां पेक्षा कर्तव्याचा विचार केलेला बरा.

मीन – ( शुभ रंग – केशरी )

नव्यानेच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करू नका. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. वाहन चालवताना इतर काही विचार करू नका.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

2020 horoscop2020 horoscopeaaj ka rashi aaj ka rashiaaj ka rashifalastrologerHoroscopejayant kulkarnijayant kulkarni astrologerjyotish jayant kulkarnirashifal horoscopetoday rashifaltoday’stoday’s horoscopetodays horoscope in marathiजाणून घ्या आजचे राशीफळजाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस
0
Share

PREV POST
Talegaon Crime News: ब्लाऊजने गळा आवळून केला सासूचा खून आणि मृतदेह लपवला पोत्यात, सून व मुलाला अटक
Leave a comment

HOROSCOPE
Today’s Horoscope 23 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
By Sudesh On मे 23, 2021
0
Share
एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग. वार – रविवार. 23 मे 2021

शुभाशुभ विचार – क्षयदिन.
आज विशेष — भागवत एकादशी.
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – हस्त 12.12 पर्यंत नंतर चित्रा.
चंद्र राशी – कन्या.

 

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- राखाडी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. आज अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल. वैवाहिक जोडीदाराकडून आज फार अपेक्षा नकोत.

वृषभ – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल असेल, विलासी वृत्ती बळावेल, कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वकांक्षा वाढणार आहेत प्रेम वीरांसाठी आज ग्रीन सिग्नल आहे.

मिथुन – ( शुभ रंग – पिस्ता)

कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची चणचण भासणार नाही. आईचे मन मात्र आज दुखावू नका.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन मनाजोगत्या नोकरीचे प्रस्ताव येतील. भावाभावांमध्ये सामंजस्याची भावना राहील.

 

सिंह – ( शुभ रंग- हिरवा)

मोठे आर्थिक निर्णय उद्याव

ग्लोबल न्युज नेटवर्क: