धक्कादायक! शेजारीण चार्जर घ्यायला गेली आणि तिने पाहिलं अस काही की..

पुणे । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित मृत महिला ही वय वर्षे ३२ वर्षाची असून कल्पना यांनी आदल्या रात्री त्यांच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या एका महिलेकडून फोनचा चार्जर आणला होता. सोमवारी सकाळी शेजारील महिलेला कामावर जायचे असल्याने कल्पना यांना चार्जरसाठी फोन केला. मात्र कल्पना यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे शेजारील महिला थेट कल्पना यांच्या घरी गेल्या.

मात्र कल्पना यांच्या घराचा दरवाजा उघडाच असल्याचे पाहून शेजारील महिला घरात गेली. यादरम्यान कल्पना रक्ताच्या थारोळ्यात मृत अढळून आल्या. ही घटना उघडकीस येताच शेजारील महिलेने सहकारनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चालू केला. एवढच नाही तर पोलिसांकडून इमारतीमधील सीसिटिव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहेत. तसेच, यावेळी संशायस्पद हलचाली करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Team Global: