राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 7 July 2022

07. 07. 2022 वार – गुरुवार.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – दुर्गाष्टमी.

राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – हस्त 12.20 पर्यंत  नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या.

————————-

आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग – लाल)

आज काही कारणाने तुम्हाला नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. एखादा शत्रू मित्रांमध्येच  लपलेला असू शकतो सावध राहा. क्रोधावर लगाम ठेवा.

वृषभ – ( शुभ रंग – क्रीम )

काही दुरावलेल्या हित संबंधात सुधारणा होईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. कलाक्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील. काही पेचप्रसंग चातुर्याने हाताळाल.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता )

व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. खेळाडूंना सराव वाढवावा लागेल. प्रॉपर्टीविषयी रखडलेली कामे पुढे सरकतील.

कर्क – ( शुभ रंग मरून) Today’s Horoscope 7 July 2022

आज काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल. आज काही चुकीचे मोह, प्रलोभने तुम्हाला आकर्षित करतील. मनावर ताबा ठेवा.

सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)

आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्य उत्साह वाढेल. उत्पन्नाचे विविध मार्ग खुले होतील. आपले म्हणणे विरोधकांना पटवून देऊ शकाल. तुमचे वक्तृत्व प्रभावी राहील.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा ) 

आज तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील, तुमचा स्वाभिमान दुखावणारी एखादी घटना घडू शकेल. स्वतःवर थोडा संयम ठेवा.

तूळ – (शुभ रंग डाळिंबी )

आज कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तीमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. आज बचतीस प्राधान्य देणे आवश्यक आहे.

वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी) 

नवीन ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. आज काही दुरावलेली नाती जवळ येतील. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. छान दिवस.

धनु – ( शुभ रंग – निळा )

आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. व्यावसायिक स्पर्धेस तोंड देण्यासाठी नव्या योजना राबवाल. सहकारी मंडळी तुमच्या मताचा आदर करतील. योग्यवेळी अधिकारांचा वापर कराल.

मकर –  (शुभ रंग – मोरपंखी ) Today’s Horoscope 7 July 2022

आज ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. मोफत सल्लागार बरीच मंडळी भेटतील.नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेऊ नका.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

नवीन व्यावसायिकांनी आर्थिक गुंतवणूक करताना आपली कुवत ओळखावी. कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत. कार्यक्षेत्रात अंतर्गत राजकारणाचा  सामना करावा लागेल.

मीन – (शुभ रंग गुलाबी )

योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यांच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. योग्य माणसे संपर्कात येतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असेच वातावरण राहील.

!! शुभम भवतु!!

– जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार )

ग्लोबल न्युज नेटवर्क: