राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार – शुक्रवार दि.    

01.07.2022 (Todays Horoscope 1 July 2022)

शुभाशुभ विचार – शुभ दिवस.

आज विशेष – साधारण दिवस. 

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – पुष्य.

चंद्र राशी – कर्क.

________________________

आजचे राशीभविष्य (Todays Horoscope 1 July 2022)

मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

शैक्षणिक क्षेत्राशी  संबंधित काही व्यवसाय असतील तर ते चांगले चालतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत, यश सोपे नाही. आज विलासी वृत्ती बळावेल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील.  अपेक्षित मेल्स येतील. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार उद्या वरच ढकला. शेजारी सलोखा वाढेल. आज आईचे मन सांभाळा.

मिथुन- ( शुभ- रंग क्रीम)

सर्व लहान मोठे आर्थिक व्यवहार यशस्वीरित्या पार पडतील. पैशाची आवक मुबलक राहील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, पण तुम्ही लक्ष देऊ नका.

कर्क – ( शुभ रंग- तांबडा)

नोकरी धंद्याच्या ठिकाणी आज अहंकारास थारा देऊ नका. मृदू वणीने अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील. गृहिणी एखादा विवाह जमवण्यात यशस्वी मध्यस्थी करतील.

सिंह- ( शुभ रंग – सोनेरी)

आज घरातील थोरांशी मतभेद संभवतात, पण फार ताणू नका. त्यांच्या वयाचा मान राखायला हवा. दूरच्या प्रवासात आज आपला मौल्यवान ऐवज सांभाळा.

कन्या – ( शुभ रंग – भगवा)

नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. आज अनपेक्षित धनलाभ होतील. नव्या धंद्याची सुरुवात करण्यास आज योग्य दिवस.

तुळ – (शुभ रंग- आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला राहील.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कृपा राहील. एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची गरज भासेल.

वृश्चिक – ( शुभ रंग – पांढरा)

कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची साथ निश्चित मिळेल. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.

धनु – ( शुभ रंग – केशरी)

आज तुम्ही आधी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे. कोणतेही धाडस टाळा.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढणार आहे. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. आज आशादायी दिवस. क्लिष्ट कामे सोपी होतील.

कुंभ – ( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. आज सकाळी साहेबांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. रुग्णांनी डॉक्टरच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.

मीन – ( शुभ रंग – पिस्ता)

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. आनंदी दिवस. उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा वाढणार आहेत. नवोदित कलाकार प्रसिद्धीने सुखवतील

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: