राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – बुधवार, दि. 24.11.2021

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – पुनर्वसु 16.29 पर्यंत नंतर पुष्य.
चंद्र राशी – मिथुन 09.50 पर्यंत नंतर कर्क.
______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित काही व्यवसाय असतील तर ते चांगले चालतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत, यश सोपे नाही. आज सहकुटुंब चैन कराल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. आज कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधान्य द्याल. विद्यार्थी अभ्यासाचे मनावर घेतील. गृहिणी स्वच्छतेस प्राधान्य देतील.

मिथुन- ( शुभ- रंग क्रीम)

सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. आज कुटुंबियांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्याकडून होईल. पैशाची आवक मुबलक राहील. आज स्पष्टवक्तेपणास थोडा लगाम घाला.

कर्क – ( शुभ रंग- तांबडा)

आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणी एखादा विवाह जमवण्यात यशस्वी मध्यस्थी करतील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)

राशीच्या व्यायातून होणारे चंद्रभ्रमण अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढवेल. दूरच्या प्रवासात आज आपला मौल्यवान ऐवज सांभाळा. घरातील थोरांशी काही मतभेद होणार आहेत.

कन्या – ( शुभ रंग – भगवा)

नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. तुमसे मन मात्र काहीसे चंचल राहील. विरोधकांना कमजोर समजू नये.

तुळ – (शुभ रंग- आकाशी)

आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कृपा राहील. एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची गरज भासेल.

वृश्चिक- ( शुभ रंग – पांढरा)

कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची साथ निश्चित मिळेल. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.

धनु – ( शुभ रंग – केशरी)

आज तुम्ही आधी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढणार आहे. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. आज आशादायी दिवस.

कुंभ – ( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. आज सकाळी साहेबांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. रुग्णांनी डॉक्टरच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.

मीन – ( शुभ रंग – पिस्ता)

आज तुम्हाला काही सज्जन मंडळींचा सहवास लाभेल चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल तुमचे विचार प्रगल्भ होतील. आनंदी दिवस असून आजची संध्याकाळ प्रिय आप्तस्वकीयांच्या सहवासात व्यतीत कराल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: