एसटी कर्मचारी संप, अनिल परब यांची एसटी कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा

 

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यंच्यात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे चर्चा झाली. “ही चर्चा सकारात्मक झाली पण अंतिम निर्णय घेण्याबाबत आज पुन्हा ११ वाजता चर्चा होणार आहे,” असं परहिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं. तसेच आज पुन्हा एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात चर्चा होणार आहे.

चर्चा झाल्यानंतर परब यांनी माध्यमांशी बातचीत केली. “एसटीचे विलीनीकरण व्हावे की नाही याबाबत उच्च न्यायालयाने एका कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीकडून जो निर्णय देण्यात येईन तो आम्हाला मान्य असेल. पण हा निर्णय येईपर्यंत अंतरिम वाढीचा प्रस्ताव आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसमोर ठेवला आहे,” असं परब यांनी सांगितलं.

गेले अनेक दिवस राज्यामध्ये एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यावर काही तोडगा निघेल का याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. याआधी अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन यावर चर्चा केली होती. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळी ऐन तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करत संप मागे घेण्याचं आवाहन केलं.

पण राज्य सरकारच्या या घोषणेला काही तास उलटत असतानाच शेवगाव आगारात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर 4 नोव्हेंबरला एसटी कर्मचाऱ्यांची एक संघटना पुन्हा संपावर गेली आणि आगारांमधलं कामकाज ठप्प झालं. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी प्रमुख आहे. सरकारने सांगितलं आहे की इतर मागण्या मान्य होऊ शकतात पण विलीनीकरण हे एका दिवसात होणार नाही. याचा सारासार विचार करावा लागेल, असं परिवहन मंत्री अनिल परब माध्यमांशी बोलताना माहिती दिली होती.

Team Global News Marathi: