राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – सोमवार, 15 नोव्हेंबर 2021
शुभाशुभ विचार – सामान्य दिवस.
आज विशेष – भागवत एकादशी.
राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 18.09 पर्यंत नंतर रेवती.
चंद्र राशी – मीन.
—————————————


आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग- मरून)

आज रिकामटेकड्या चर्चेत व वाद विवादात तुमचा वेळ फुकट जाईल. खर्च आवाक्‍याबाहेर जाईल महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. काहींचा गुढ शास्त्राकडे कल राहील. घराबाहेर वावरतांना क्रोधावर लगाम हवा.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील.

मिथुन- ( शुभ रंग- गुलाबी)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल.

कर्क -(शुभरंग- पिस्ता)

नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. आज वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल व सहकाऱ्यांशी ही जुळवून घ्यावे लागेल. मीपणा सोडलात तर बरीचशी कामे सोपी होतील.

सिंह-( शुभ रंग- पांढरा)

तरुणांनी कुसंगती पासून लांब रहावे. नीतीबाह्य वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. सासुरवाडी करून एखादा धनलाभ होऊ शकतो. आज प्रतिष्ठेस जपा.

कन्या-( शुभ रंग- चंदेरी)

नोकरीत वरिष्ठ खुश असतील. हाताखालच्या माणसांवर वचक राहील. आज तुम्ही काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतील.

तूळ – ( शुभ रंग – सोनेरी)

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. वेळीच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. दुकानदारांची उधारी उसनवारी वसूल होईल. हितशत्रू सक्रिय आहेत तुम्ही सतर्क राहा.

वृश्चिक – ( शुभ रंग – नारंगी)

महत्त्वाच्या कामास विलंब होईल बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील हाती असलेला पैसा जपून वापरा. आज प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

धनु- ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

मकर- ( शुभ रंग- निळा)

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. कदाचित शेजाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज लागेल.

कुंभ-( शुभ रंग- क्रीम)

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल, त्याचप्रमाणे खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. नाती जपायची असतील तर आज स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून फक्त गोड गोड बोला.

मीन – (शुभ रंग- जांभळा)

आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपले व्यक्तिमत्व प्रभावी राहील. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

!! शुभम भवतु!!

– जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: