राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज ; आजचे पंचांग – वार – मंगळवार, दि. 09.11.2021

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष – पांडव पंचमी.
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा 16.59 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
चंद्र राशी – धनु 22.37 पर्यंत नंतर मकर.
_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- पिस्ता)

आज कोणत्याही नव्या उपक्रमाची सुरुवात टाळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल, काही सज्जनांचा सहवास लाभेल. विचार प्रगल्भ होतील. उपासनेची प्रचिती येईल.

वृषभ- ( शुभ रंग- लाल)

सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा करू नका. आज काही पूर्वीच्या चुका निस्तरव्या लागणार आहेत. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत.

मिथुन (शुभ रंग- चंदेरी)

आपल्या अती सडेतोड बोलण्याने कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमध्ये न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

कुणाकडून येणी असतील तर ती मागायला लाजू नका. पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे होणे हिताचे आहे. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज भासेल.

सिंह- ( शुभ रंग- हिरवा)

उच्चशिक्षित असाल तर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. प्रतिष्ठितांच्या ओळखीतून आपला स्वार्थ साधून घेता येईल. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल.

कन्या- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कष्टांचा हि अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण हे लक्षात असू द्या. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क कसे करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

तूळ -(शुभ रंग – मरून)

घर दुरुस्तीच्या काही किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. घर खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे. शेजारी आज आपलेपणाने डोकावतील.

वृश्चिक- ( शुभ रंग- जांभळा)

व्यावसायिक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्याच मतावर अडून बसाल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

धनु -(शुभ रंग – निळा)

आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका. एखादी गहाळ झालेली वस्तू आज अचानक सापडेल.

मकर- ( शुभ रंग- भगवा)

बेरोजगारांनी रोजगारासाठी घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवायला हवी. आज खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपून वापरावी.

कुंभ-( शुभ रंग- मोतिया)

आज तुमचे मनोबल उत्तम असून काही मनासारख्या घटना घडतील. दैनंदिन व्यवहार विनाव्यत्यय पार पडतील. वास्तू किंवा वाहन खरेदीचे व्यवहार मार्गी लागतील.

मीन (शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक घटना घडतील. नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. ऑफिस कामाच्या व्यापात कौटुंबिक गरजा दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – पांडव पंचमी.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: