गोपीचंद पडळकरांच्या जिवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याला राष्ट्रवादी जबाबदार असणार

 

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर राष्ट्रवादी- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पडळकरांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी-शविसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान हा हल्ला झाला होता. त्यानंतर पडळकरांनी राष्ट्रवादी व महाविकास आघाडीवर अनेक आरोप लावले होते. आता या वादात आमदार सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे.

सदाभाऊ खोत यांनी पडळकरांना समर्थन देत राष्ट्रवादी-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘पडळकरांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याला राष्ट्रवादीचे नेते जबाबदार असतील’, असा इशारा खोतांनी दिला आहे. पडळकरांनी याआधी महाविकास आघाडीनेेच षडयंत्र रचून आपल्याला संपवण्यासाठी हल्ला केला होता, असा गंभीर आरोप केला होता.

पडळकर हे सामान्य घरातून आलेले नेते आहेत. ते बहुजनांचे नेतृत्व आहेत. कष्टकऱ्यांना न्याय देण्याचे ते काम करत आहेत. मात्र त्यांना रोखण्यासाठी विरोधक चुकीच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत, असंही खोत म्हणाले आहेत. राष्ट्रवादीकडून याआधीही त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत, असं सांगून पुढे त्यांनी ‘असे हल्ले होत राहिले तर बहुजन समाज शांत बसणार नाही. तो रस्त्यावर उतरेल’, असा इशारा दिला आहे.

Team Global News Marathi: