राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – शनिवार, दि. 02.10.2021

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- महात्मा गांधी जयंती, इंदिरा एकादशी, एकादशी श्राद्ध.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- राखाडी)

स्थावर इस्टेटी विषयी रखडलेली कामे गती घेतील. मानसिक शांतता लाभेल व आरोग्यही उत्तम राहील. आज अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल.

वृषभ- ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन मनाजोगत्या नोकरीचे प्रस्ताव येतील. भावाभावांमध्ये सामंजस्याची भावना राहील.

मिथुन -( शुभ रंग – पिस्ता)

कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची चणचण भासणार नाही. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

कर्क-( शुभ रंग- पांढरा)

आज तुमच्या वागण्यात इतरांना लहरीपणा जाणवेल. आज तुम्ही स्वतःचेच खरे कराल. तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे काही आपलीच माणसे दुखावली जातील.

सावधान ! पुढील 3 तास राज्यात विजांसह मुसळधार पाऊस

सिंह- ( शुभ रंग- हिरवा)

मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. विश्वासातील माणसाकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आज कोणालाही सल्ले द्यायच्या भानगडीत पडू नका.

कन्या- ( शुभ – रंग भगवा)

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. काही अनपेक्षित लाभ होतील. मित्रमंडळीत तुम्हाला मोठेपणा मिळेल. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल कराल.

आईला शेवटचा सॅल्युट करून आर.आर.पाटील यांचे बंधू पोलीस सेवेतून निवृत्त, भाऊ गृहमंत्री असतानाही 20 वर्षे साईड ब्रॅंचला काम

तूळ – (शुभ रंग- नारिंगी)

आकस्मिकपणे आलेल्या व्यवसायिक अडचणींवर यशस्वीपणे मात कराल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर मुळीच अवलंबून राहू नका. आज सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. ध्येय सध्या होतील.

वृश्चिक- ( शुभ रंग केशरी)

कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीरीत्या हाताळाल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे हमखास फळ मिळेल. संततीकडून काही चांगल्या बातम्या येतील.

दिवाळीनंतर सुरू होणार महाविद्यालये, 1 नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष

धनु – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला बेचैन करतील. कौटुंबिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होईल. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेसे मतभेद होतील परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल.

मकर -( शुभ रंग- गुलाबी)

ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना सल्ले देण्याचा ठेका घेऊ नये. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असणे हिताचे राहील. आजी-आजोबांनी घरगुती प्रश्‍नात लक्ष न घालता देवधर्मात रमावे.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. नवीन ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून पिणे हिताचे राहील. गाडी चालवताना कोणतीही रिस्क नको.

मीन -( शुभ रंग -आकाशी)

काही रसिक मंडळी आज कामावर दांडी मारून करमणुकीस प्राधान्य देतील विलासी वृत्ती बळावेल, कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वकांक्षा वाढतील. प्रेम वीरांसाठी आज ग्रीन सिग्नल आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तु सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: