सावधान ! पुढील 3 तास राज्यात विजांसह मुसळधार पाऊस
ग्लोबल न्यूज – ‘गुलाब’ नंतर आता ‘शाहीन’ (shaheen cyclone update) चक्रीवादळ अरबी समुद्रात गुरुवारपासून दाखल झाले आहे. दरम्यान उत्तर अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागांवर धडकलेले हे चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकले आहे. याचा प्रभाव उत्तर कोकणावरही होणार असून पुढील तीन तास राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची (heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. (mansoon update)
दरम्यान, यामध्ये पश्चिम महाराष्टातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. याशिवाय पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, वर्धा, वाशिम असा अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या प्रदेशातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (heavy rain)
गेले काही दिवस सुरु असलेल्या गुलाब चक्रीवादळामुळ पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकाच आठवड्यात दोन चक्रीवादळ तयार झाली असल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.
‘शाहीन’मुळे गुरुवारी सकाळपर्यंत उत्तर कोकण, गुजरात, कच्छ आणि सौराष्ट्रला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही देशात काही ठिकाणी येत्या २४ तासांत या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.