राशिभविष्य:जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: बुधवार, 29 सप्टेंबर रोजी आद्रा नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस…

मेष : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
कामधंद्याच्या ठीकाणी तुमचे महत्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारून त्या पूर्ण कराल. वरीष्ठांच्या कतुकास पात्र व्हाल. यशदायी दिवस.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ९
व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल.काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संतती बाबत काही आनंददायी घटना घडतील. छान दिवस.

मिथुन : शुभ रंग : मोतिया | अंक : ७
कंजूषपणा करून काही उपयोग नाही. असा काही खर्च उद्भवणार आहे की जो टाळणे शक्य नाही. घरातील थोरांचे सल्ले विचारात घेणे गरजेचे आहे.

कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : ८
लहरी आणि हट्टी स्वभाव काब्ूत ठेवा. कार्यक्षेत्रात तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखद्या प्रसंगी सामंजस्याने मार्ग काढावा लागेल. पत्नीचे ऐका.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
ऑफिसच्या कामासाठी प्रवास घडू शकतील. आज काही प्रवासात होणाऱ्या ओळखी भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतील. घराबाहेर वाद संभवतात.

तूळ : शुभ रंग : केशरी| अंक : ३
आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.शिक्षणाशी निगडीत व्यवसाय तेजीत चालतील. आज कलाकारांना मात्र स्ट्रगल वाढवावी लागणार आहे.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
नोकदरांना काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा कारण जोडीदार आतुरतेने वाट बघत असेल. आनंदी दिवस.

धनू : शुभ रंग : मरून | अंक : २
काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही डोक्यास ताप देणारी मंडळी भेटू शकतील. मानसिक संतूलन ठेवणे गरजेचे अहे.

मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर खुष असेल.

कुंभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ३
विरोधक सक्रिय असताना कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. कुणाकडून कसली अपेक्षाच करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ येणार नाही.

मीन: शुभ रंग : अबोली | अंक : १
कामाच्या ठीकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही.मानसिक शांतीसाठी सत्संगाकडे पाय वळवाल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: