हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर ईडी करणार आनंदराव अडसूळ यांची चौकशी |

 

मुंबई | सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ ईडीच्या चौकशीवेळी अत्यवस्थ झालेल्या त्यांची चौकशी काही दिवसांसाठी टळली आहे. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून प्रकृती पूर्ववत झाल्यावर त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे एक अधिकारी वगळता ईडीचे पथक रुग्णालयातून माघारी परतले आहे. अधिकाऱ्याला अडसूळ यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली असल्याचे समजते.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ९८० कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष असलेल्या अडसूळ पिता-पुत्राकडे सोमवारी कांदिवली येथील निवासस्थानी चौकशी करण्यास अधिकाऱ्यांचे पथक गेले. मात्र त्यावेळी समन्स बजावून ताब्यात घेतले जात असताना अडसूळ यांची प्रकृती बिघडली. त्यांना गोरेगाव येथील लाइफ लाइन रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचे पुत्र अभिजित व कुटुंबातील सदस्याबरोबर ईडीचे अधिकाऱ्याचे एक पथकही सोबत होते.

सर्व चाचण्या केल्यानंतर त्यांना ४८ तास देखरेखीखाली ठेवावे लागणार असल्याचे रुग्णालयकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सुमारे १४ तास त्यांच्यासोबत असलेले ईडीचे पथक माघारी परतले. रुग्णालयातील घडामोडीवर आई त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवण्यासाठी तेथे एका अधिकाऱ्याला ठेवण्यात आले आहे. अडसूळ व त्यांच्या मुलाकडे ते रुग्णालयातून घरी परतल्यावर चौकशी केली जाईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Team Global News Marathi: