राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा सोमवार तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज ​- आजचे पंचांग. वार – सोमवार 22 मार्च 2021

शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
आज विशेष — दुर्गाष्टमी.
राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा 21.08 पर्यंत नंतर पुनर्वसु.
चंद्र राशी – मिथुन.

 

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

सकाळी पैशांनी भरलेले खिसे आज दुपारनंतर रिकामे होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडणार आहेत. प्रवासातील ओळखी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

आज दुपारनंतर अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. तुमची मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून देऊ शकाल.

मिथुन – ( शुभरंग- मोरपंखी)

काल पासून एखादी वस्तू हरवली असेल तर ती आज परत शोधा, दुपारनंतर ती सापडू शकेल. आज लहरी आणि हट्टी स्वभाव काबूत ठेवा. काही प्रश्न सामंजस्याने सोडवावे लागणार आहेत.

कर्क – ( शुभ रंग – डाळिंबी)

उद्योग व्यवसायात आज मनाजोगती धनप्राप्ती होईल. काही नवीन हितसंबंध तयार होतील. मित्र आज दिलेली आश्वासने पळतील. नाती सांभाळायची असतील तर फार खोलात न शिरता गोड गोड बोला.

स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे खोटे आरोप केले आहेत- गृहमंत्री अनिल देशमुख

सिंह – ( शुभ रंग- पिस्ता)

आज हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. संततीबाबत काही आनंददायी घटना घडतील.

 

कन्या – ( शुभ रंग – सोनेरी)

व्यवसायात मोठ्या आर्थिक उलाढाली करताना भागीदारांना विश्वासात घ्या. रखडलेली शासकीय कामे दुपारनंतर गती घेतील. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेला पैसा जपून वापरावा.

तूळ – (शुभ रंग – चंदेरी)

आज मनाच्या द्विधा अवस्थेत कोणतेही निर्णय घेण्याची घाई करू नका. विरोधकांना व स्पर्धकांनाही कमजोर समजू नका. घरात वडीलधार्‍या मंडळींच्या हो ला हो करून विषय संपवलेला बरा.

खरे प्रेम कशाला म्हणतात …वाचा सविस्तर-

वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी)

वैवाहिक जीवनात एकमत असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. आज धाडसाची कामे टाळा. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.

धनु – ( शुभ रंग – चंदेरी)

केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मागून नावे ठेवणार्‍या मंडळींकडे दुर्लक्ष करा. वैवाहिक जीवनात संध्याकाळी जुन्या आठवणी ताज्या कराल.

मकर – ( शुभ रंग- क्रीम)

काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील, सतर्क राहा. एखादा जुना आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. आज काही डोक्याला ताप देणारी मंडळीही भेटतील. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट,काळजी वाढली ! रविवारी सर्वाधिक 30,535 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बर्‍याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आशादायी दिवस असून आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. तरुणांचा आधुनिक राहणीमानाकडे कल राहील.

मीन – ( शुभ रंग – मरून )

आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. शिक्षणाशी निगडित व्यवसाय तेजीत जाणार आहेत. ऑफिस मधील महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा. मातोश्री कडून काहीतरी लाभ संभवतो.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

साभार एमपीसी न्यूज

ग्लोबल न्युज नेटवर्क: