काँग्रेस-शिवसेनेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ – जयंत पाटील

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या उमेदवार निवडणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील शासकीय निवास्थानी बैठक पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री अजित पवार उपस्थित होते.

या निवडणुकीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीबाबत आम्ही पक्ष म्हणून एक निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि काँग्रेस या मित्रपक्षांशी चर्चा करु आणि अंतिम निर्णय जाहीर करु, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. या बैठकीनंतर ते दिल्लीत पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची तब्बल दीड तास बैठक चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा जागेसंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त पाटील यांनी दिले, मात्र तिकीट कोणाला दिले जाणार हे अदयाप समोर आलेले नाही.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता.

Team Global News Marathi: