राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

मंगळवार 10 ऑगस्टचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

मेष – आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. विघातक विचार, कृती व नियोजन ह्यापासून दूर राहावे. पोटदुखीचा त्रास संभवतो. शक्यतो आज प्रवास टाळावा. सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ – आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. संततीसाठी खर्च करावा लागेल.

मिथून – आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्‍यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. अचानकपणे वैचारिक बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज भासेल.

कर्क – आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. अवैध बाबीं पासून दूर राहावे. आज खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह – आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. बोलणे – वागणे संयमित ठेवावे लागेल. रागाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कन्या – आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा व संतापाचे प्रमाण वाढेल. मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अचानकपणे खर्च वाढतील. शक्यतो वाद व संघर्ष ह्यापासून दूर राहावे.

तूळ – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.

वृश्चिक – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे आनंदित व्हाल.

धनू – आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. वरिष्ठांशी संघर्ष संभवतो. प्रतिस्पर्धी व विरोधकांशी दोन हात करावे लागतील.

मकर – आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद संभवतात. सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल.

कुंभ – आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आनंददायी सहल, प्रवास, स्वादिष्ट भोजन व नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. सार्वजनिक मान – सन्मान वाढेल. विवाहितांना उत्तम वैवाहिक सौख्य उपभोगता येईल. भागीदारीत लाभ संभवतो.

मीन – आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्वास्थ्य उत्तम राहील

ग्लोबल न्युज नेटवर्क: