“मेडल मोदी जी जीतकर लाये है क्या?”; ऑलिम्पिक पदक विजेत्याने व्यक्त केली नाराजी

 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणारे आणि सफल कामगिरी करणारे सर्व खेळाडू काल मायदेशी परतले. सर्व खेळाडूंचे नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पदकविजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मात्र या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्र्यांबरोबरच खेळाडूंनाही आपली मत व्यक्त केली. मात्र या कार्यक्रमासाठी मंचावर लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या बॅकड्रॉपने सर्वांचेच लक्ष वेधले. मंचावरील या पोस्टरवर पदक विजेत्या खेळाडूंच्या फोटो पेक्षा पंतप्रधान मोदींचा फोटो आकाराने मोठा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

यावरुनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. मंचावरील या बॅनरचा फोटो शेअर करत विजेंदरने ‘सर्व गोष्टी या पीआरचा भाग आहेत आणि पीआरच सर्वकाही आहे,’ असा टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: