राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा सोमवार आपल्यासाठी

ग्लोबल न्यूज- आजचे पंचांग. वार – सोमवार 29 मार्च 2021

 

शुभाशुभ विचार – करिदिन
आज विशेष — धुलीवंदन.
राहू काळ – सकाळी 07.30 ते 9.00
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – हस्त 15.02 पर्यंत नंतर चित्रा.
चंद्र राशी – कन्या.

 

आजचे राशीभविष्य

 

मेष – (शुभ रंग – क्रीम)

आजारी व्यक्तींनी पथ्य पाळण्याची काळजी घ्यायला हवी आहे. डॉक्टरांचा सूचना तंतोतंत पाळा अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.

वृषभ – ( शुभ रंग- पांढरा)

घरात आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल नव्या नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

मिथुन – (शुभ रंग- राखाडी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून आज कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

 


कर्क – (शुभ रंग मोतीया)

दैनंदिन कामातही काही अडचणींचे डोंगर उभे राहतील. कर्ज मंजुरी च्या कामात काही अडथळे येतील. मुलांना आज अभ्यास सोडून सर्व काही सुचेल. घराबाहेर वाद टाळा.

सिंह – (शुभ रंग- हिरवा)

आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरणार आहेत. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. आज काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधूळ झाडतील.

 

कन्या – ( शुभ रंग – लाल)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल. आज अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची साथ मोलाची राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव राहील.

तूळ – ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्हाला काही देणी चुकवावी लागणार आहेत. हौस-मौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. आज जरा डोळ्यांची निगा राखा. महत्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

वृश्चिक –(शुभ रंग- गुलाबी)

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. प्रतिष्ठित लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घ्याल. संततीकडून काही सुवार्ता येतील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा धनलाभ संभवतो.

धनु – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. महिलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळेल.

मकर – ( शुभ रंग- भगवा)

शासकीय कामे रखडणार आहेत. नोकरीत वरिष्ठांचे समाधान होणे केवळ अशक्य. गृहिणींचा आज देव धर्माकडे ओढा राहील. आणि आज देव नवसाला पावेल सुद्धा.

कुंभ – ( शुभ रंग- केशरी)

कुठेही गुंतवणूक करताना झटपट लाभाचा मोह टाळा. आज गोडबोल्या मंडळी पासून दोन हात दूरच राहणे हिताचे. आज कोणतीही रिस्क नकोच. फक्त नाकासमोर चालण्यास प्राधान्य द्या.

मीन – ( शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. ध्येयाचा पाठलाग करताना प्रकृतीकडे दुर्लक्ष होणार आहे. वैवाहिक संबंधात मधुरता राहील. आज पत्नीचे सल्ले डावलू नका.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

ग्लोबल न्युज नेटवर्क: