जर लॉकडाऊन करायचा असेल तर….गोपीचंद पडळकरांनी दिला राज्य सरकारला हा इशारा

राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मात्र लॉकडाऊन केल्याने निश्तिच कोरोनाला लगाम लागेल पण यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांना देखील अनेक संकटाना सामोरे जावे लागते. हीच परिस्थिती लक्षात घेवून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी द्राक्ष शेती करणाऱ्यांची भूमिका सरकार समोर मांडली आहे.

या संदर्भात ते ट्विट करून म्हणतात की, पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी गटाने आज झरे येथील निवासस्थानी भेट घेतली. लॉकडाऊन पूर्वी द्राक्षेला सरासरी ५० रु. किलो जागेवर दर होता. परंतू लॉकडाऊन मध्ये १० ते १५ रु. किलो प्रमाणे द्राक्षे विकली गेल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. असे ट्विट त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: