कोल्हापूर | सध्या हनीट्रॅपमुळे अनेकांची फसवणूक होत असून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. असाच रप्रकार आता इचलकरंजी मध्ये घडला असून सदर व्यक्तीने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सोशल मीडियावर तरुणीची मैत्री करणं कोल्हापूरमधल्या या तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या इचलकरंजीमधल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सदर व्यक्तीची नेहा शर्मा नामक एका तरुणीशी ओळख झाली. ओळखीचं रुपांत मैत्रीत झालं, दोघांचे चॅटिंग आणि व्हिडिओ संवाद सुरु झाले. नेहा शर्माने संतोषला आपल्या बोलण्यात फसवलं आणि संतोषचा व्हॉट्सअॅप नंबर घेतला. त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉल करत या तरुणीने अश्लील चाळ करायला सुरुवात केली. यानंतर या तरुणीने संतोषलाही नग्न होण्यास भाग पाडलं.
हा सर्व प्रकार या तरुणीने रेकॉर्ड केला आणि त्यानंतर तीने संतोषकडे पैशाचा तगादा सुरु केला. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी या तरुणीने दिली. यामुळे घाबरलेल्या संतोषने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी संतोषचा मोबाईल तपासल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या घटनेची नोंद इचलकरंजीमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. मात्र या घटनेतून सोशल मीडियावर जास्त काळ व्यस्त करणाऱ्या तरुण आणि तरुणांनी यातून बोध घेतला पाहिजे.