मुंबईत होम क्वारंटाइन रुग्णांचा कार्यकाळ वाढवला आता इतके दिवस राहावे लागणार क्वारंटाइन !

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या बृहमुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य खात्याची चिंता वाढवणारी आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनपाने नियम अधिक कडक केले आहे.

मुंबईत होम क्वारंटाइन रुग्णांना १७ दिवस घरीच राहावे लागणार आहे. महापालिकेने त्यासंदर्भातलं परिपत्रक जारी केले आहे. लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना एकूण १७ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पाळावा लागणार आहे.

या कालावधीमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. मुंबईत ३ एप्रिल रोजी ९ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाची भीषणता लक्षात येते. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आरोग्ययंत्रणाही कमी पडू शकते.

Team Global News Marathi: