गृहमंत्री वळसे पाटील मतदारसंघातील नागरिकाची न्यायायासाठी मंत्रालयासमोर आत्महत्या

 

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याच मतदारसंघातील नागरिकाने न्याय मिळवण्यासाठी आपला प्राण गमावला आहे. शुक्रवारी (२० ऑगस्ट) मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पत्र पाठवून त्यांनी आपली कैैफियत मांडली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.मुंबईतील जिटी रुग्णलायात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.

सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी ते गार्डन गेटजवळ येऊन छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यावेळी उपस्थित तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून जाधव यांनी आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये आपल्यासोबत कशाप्रकारे अन्याय झाला, याची व्यथा मांडली होती. आरोपींनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप त्यांनी केला होता. सुभाष जाधव यांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शुक्रवारी मुंबईत मंत्रालय परिसरात आले.मात्र न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत त्यांनी आपले जीवन संपवून घेतले .

Team Global News Marathi: