नारायण राणे आपला 12 मजली बंगला तोडण्याचे धाडस दाखवतील का? वैभव नाईक

 

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीतील बंगला बांधताना CRZ कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या बंगल्यावर कारवाई कारण्यात आली याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार टीका सेनेवर केली होती . आता सेनेच्या या टीकेला आमदार वैभव नाईक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. बांधकाम अनधिकृत असेल तर ते स्वत: तोडण्याचं धाडस आज मिलिंद नार्वेकर यांनी दाखवलं आहे. पण, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथील १२ मजली बंगलाही CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधला आहे. मग असं धाडस आता राणे दाखवणार आहेत का? असा थेट सवाल शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थितीत केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आपला दापोलीतील आलिशान बंगला जमीनदोस्त केला आहे. या प्रकरणावरून भाजपने नार्वेकरांवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. मिलिंद नार्वेकरांना बंगला बांधताना CRZ कायद्याचं उल्लंघन झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बांधलेला बंगला पाडण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे बांधलेला बंगला पाडण्याचं धाडस मिलिंद नार्वेकर यांनी दाखवून राजकारणात एक चांगला पायंडा पाडला आहे असं वैभव नाईक म्हणाले. तसंच, सदर बंगल्याला स्थानिक तहसील किंवा तलाठी यांच्याकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही.

तरी किरीट सोमय्या चुकीची माहीती पसरवत आहेत. पण, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथील १२ मजली बंगलाही CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधला आहे. जसा मिलिंद नार्वेकर यांना स्वत:हून बांधकाम पाडण्याचा पायंडा पाडलांय तसा भाजपचेही नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे दाखवणार आहेत का? असा सवालही नाईक यांनी केला. तसेच नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू असे सुद्धा नाईक यांनी बोलून दाखविले होते,

Team Global News Marathi: