‘हिंदू खतरे में है’; भाजप आमदार नितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहे, त्यात आता पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका केली आहे.

हिंदू खतरे में है, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात राणे यांनी एक ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, हिंदू समाज, हिंदू सण आणि हिंदू संस्कृतीवर महाराष्ट्र सरकारच्या मदतीने नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत. यासंदर्भात असंख्य घटना कानावर येत आहेत.

 

तसेच पश्चिम बंगालसारखा मुंबईत राहणारा ‘हिंदू खतरे में है’ असं सांगण्याची वेळ आली आहे, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांच्या या गंभीर आरोपानंतर आता ठाकरे सरकार मधील नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागणार आहे.

कोरोनाचा धोका कमी होऊ लागल्याने ठाकरे सरकार हळूहळू निर्बंध शिथील करत आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारने प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. यावरुन भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील ठाकरे सरकारवर निषाणा साधला होता. मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, अशी टीका तुषार भोसले यांनी केली होती.

Team Global News Marathi: