ड्रॅगन फ्रूट खाण्याचे हे आहेत 5 आश्चर्यकारक फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच अनेक आजार बरे करते

ड्रॅगन फ्रूट खाण्याचे हे आहेत  5 आश्चर्यकारक फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच  अनेक आजार बरे  करते

यावेळी पावसाळ्यात बऱ्याच बाग प्रेमींच्या घरी ड्रॅगन फ्रुट ची लागवड झाली आणि त्याला फळेही लागलेली आहेत तर चला जाणून घेऊया या फळाबद्दल थोडी माहिती

🌀पाहिल्यानंतर ते किवी वर्गातील वाटते. पण हे फळ कॅक्टस गटातील आहे. या फळाला पिटाया किंवा पिठाया असे म्हणतात. अमेरिकेत ही फळ वाळवंटात फळ मिळतात.  हे फळ बाहेरुन गुलाबी रंगाचे असते आणि त्याचा गर पांढऱ्या रंगाचा असतो. हा गर चवीला फार वेगळ्या चवीचा लागत नाही. यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. त्या काळ्या तिळाप्रमाणे दिसतात. त्याची चव चुरचुरीत लागते. पण य फळाची चव अजिबात गोड किंवा कडू नसते. हे फळ भारतात प्रकर्षाने आता मिळू लागले आहे. हे फळ बाजारात बाराही महिने मिळते. ड्रॅगन फ्रुटमधील घटक लक्षात घेता ते आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे


🌀प्रतिकारशक्ती वाढविण्याव्यतिरिक्त, या फळामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका देखील कमी होतो. अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट्स, फाइबर्स आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले ड्रॅगन फळ अनेक गंभीर आजारांवर फायदेशीर ठरते. आज या लेखातून आपण ड्रॅगन फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे:
🌀एकदम भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच 90% पाणी असते. बाहेरुन जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो आणि त्यात किवी सारख्या बिया असतात. त्या खाल्यातरी चालतात.

🌀हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे असे म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे विटामिन सी चे भरपूर कोठार. विटामीन सी असले की रोग प्रतीकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही.

🌀ड्रॅगन फ्रूटने सौंदर्य ही वाढते. ह्या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता, केसांचा मास्क बनवू शकता. त्याने चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी हजार रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाण्याने तुम्ही  तरुण रसरसलेले दिसतात.

🌀ह्याच्यामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. साहिजकच एकदा पोट साफ असले की 90% व्याधी नाहीशा होतात. म्हणजेच रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी राहते. म्हणजे डायिबटीस धोका टळला. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका रहात नाही. तसेच ह्यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकार सर्वावर मात करता येते.

🌀ह्या फळांमधील अंँटीऑक्सिडंट आणि विकरे केसांचे सौन्दर्य खुलविते. ह्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. ह्यातील लोह रक्ताचे हेमोग्लोबिन वाढवते आणि एनिमेया होऊ देत नाही.

🌀खरे पाहता हे आंबट फळ आहे तरी ह्यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. तसेच ह्याच्यामुळे दात व हाडे मजबूत होतात. डेंग्यू झाल्यावर आपले हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. पण ह्या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तयच बरोबर हाडे पण मजबूत होतात. तेव्हा डेंग्यू ची भीती हि कमी होईल.

🌀अतिशय महत्त्वाचे म्हणजे हे फळ कन्सर ला अटकाव करते. कारण कि फळामध्ये लायाकोपेन नावाचे विकर असते. ते विटामीन सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते. ह्या फ्ल्याच्य सालीत पण पॉलीफेनोल आणि रसायने असतात जे कि काही विशिष्ट कॅन्सर पासून संरक्षण करते.

🌀रक्ताल्पता असलेल्या एनिमिक गर्भवतीनां रक्तातील होमोग्लोबिन कमी होते आणि बाळाला कमी होमोग्लोबिनची मात्र कमी पडते. ह्या फळाच्या सेवनाने गर्भवती चे होमोग्लोबिन वाढते.

🌀माणसाचे जे जे मोठे शत्रू रोग आहेत त्या त्या सर्वांचा हे फळ नाश करते. रोगप्रतिकार शक्ती पासून ते कॅन्सरविरोधी शक्ती पर्यंत हि शक्ती निरोगी बनवते.

🌀सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे, लठ्ठपणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे ह्या गाळाचे सेवन केल्यास लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत होते.
मधुमेह नियंत्रित करण्याचे काम करते
🌀ड्रॅगन फळाचा वापर डेंग्यूच्या उपचारात उपयुक्त ठरू शकतो. ड्रॅगन फळाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल आणि अँटीऑक्सिडेंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. यामुळे हाड आणि दात मजबूत होतात.

आता आपण ड्रॅगन फ्रुट पासून बनलेल्या काही रेसिपीज पाहू
1. प्रथम एक ड्रॅगन फ्रुट घेऊन त्याचे बाहेरील कव्हर बाजूला करून तुकडे करून घ्या दूध साखर आणि ड्रॅगन फ्रुट चे तुकडे मिक्सरला फिरवून घ्या काचेच्या ग्लासमध्ये ओतून घ्या सुंदर पैकी ड्रॅगन फ्रुट मिल्क शेक तयार

👸जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर या फळाच्या सेवनामुळे आणि फळाचा गर चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचेवरील पिंपल्सच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. खूप पिपंल्स असणाऱ्यांनीच आताच घरी ड्रॅगन फ्रुट आणावे. त्याचा गर काढून घ्यावा. त्याचा रस काढून हे तयार सीरम तुम्ही चेहऱ्याला लावून चोळा. तुम्हाला नक्कीच त्यामुळे त्वचेत झालेला फरक जाणवेल.
👸ड्रॅगन फ्रुटच्या सेवनामुळे त्वचेला ग्लो मिळण्यास मदत मिळते. जर त्वचेची जळजळ झाली असेल तर तुम्ही ¼ कप ड्रॅगन फ्रुट घ्या त्यामध्ये तुमच्या आवडीचे तेल घ्या व्हिटॅमिन E घेतल्यास चालू शकेल. ते एकत्र करुन तुम्ही चेहऱ्याला चोळा. साधारण 10 मिनिटांसाठी ठेवा. नंतर चेहरा धुवून टाका. तुम्हाला त्वचेत फरक झालेला नक्कीच दिसेल.

👸वयोमानानुसार त्वचेमध्ये अनेक बदल होत असतात. त्वचा ही सैल पडू लागते. ड्रॅगन फ्रुटमध्ये असलेले घटक हे चेहऱ्यावरील पोअर्स कमी करुन त्वचा घट्ट करण्याची काम करतात.

👸त्वचा ही हल्ली प्रदूषणामुळे खराब होण्याची अधिक भीती असते. रेडिकल्स पासून त्वचेचे अधिक नुकसान होते. त्वचेचे हे नुकसान टाळायचे असेल तर तुम्ही ड्रॅगन फ्रुटचने सेवन करता. ड्रॅगन फ्रुटचा गर काढून त्याचा रस काढून घ्या तो हायरोलिक क्रिम किंवा  एखादे सीरम घ्या त्यामध्ये याचा अर्क घाला. दररोज रात्री ते चेहऱ्याला लावा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक आवरण तयार होते. जे तुमच्या त्वचेची रक्षा करते.

🛑वरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते कोणाला काही गोष्टींची अलर्जी असते सर्वच उपाय सर्वच प्रकारच्या लोकांना उपयोगी होतीलच असे नाही तेव्हा काही त्रास होऊ नये म्हणून तुमच्या शरीराला नक्की काय झेपेल हे तुम्ही डॉक्टरांकडून जाणून घेतलेलं पाहिजे
🛑
माहिती संकलन शितल गरुड  नाशिक

ग्लोबल न्युज नेटवर्क: